Wednesday, October 22, 2008

स्केचिंगची तयारी (२)

स्केचिंग ची तयारी केलीत. अगदी मनाची सुध्दा तयारी झाली. मनात काय काढू आणि काय नाही अशी घाई पण झाली. विषयांची पण भाईगर्दी झालीय ! हो ना ?

थोडे थांबा , विचार पक्का ..... मारा शिक्का !

अ) चित्राला सुरूवात करीत आहात, सरळ वर पासून खाली पर्यन्त स्केचिंग करीत सुटु नका.

ब) विषयाच्या तपशिलात एकदम शिरू नका.

क) कुठल्याही कोणीतरी काढलेल्या चित्राची कॉपी अजिबात करू नका.



तुमच्या कल्पनांना मोकळे सोडा त्यांचा भरपूर वापर करा. येणारी प्रत्येक अनुभूती आठवा व तिला आत्मसात करायचा प्रयत्न सतत चालू राहूदे. कलाकार हा नवनिर्मीती करणारा आहे मात्र गुरफटू नका , वाहावत जाऊ नका आपला पहीला उद्देशाचे सतत भान असुद्या नाहीतर त्यातून भलतंच काहीतरी बाहेर येईल जे तुम्हाला ही अगम्य असेल !

मन उघडे ठेवा जे उमगले नसेल ते आपोआप उमगेल सचोटी हा कलेचा खरा व मुख्य आधार आहे. निराशा , तिला अजिबात जवळ फिरकू सुध्दा देऊ नका.सगळेच प्रतिथयश कलाकार या अवस्थेतून गेलेले आहेत, तुम्हीच काही पहीले नाहीत.



(क्रमशः)

No comments: