Thursday, November 6, 2008

स्केचिंगची तयारी..(४)

स्केचिंगची तयारी..(४)

आपण वस्तू कडे चित्र काढण्यापुर्वी डोळस पणाने पहायला शिकलो. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे दिसते तेंच काढा ! जे पुर्वापार मनात ठसलेले आहे माहीती झालेले आहे ते काढू नका !!



आपल्या मनाचा आपल्या चित्रकलेशी अन्योन्य साधारण संबंध आहे. आपल्या मनात ठसलेली एखादी गोष्टच आपण स्केच करताना कागदावर उतरविण्याच्या प्रयत्नात असतो. किंबहुना त्याचाच आपल्या मनावर जबरदस्त पगडा असतो. प्रत्यक्ष डोळ्यापुढे वेगळेच काही असते. ही जी मनाची अवस्था असते तीच स्केचिंग करतांना सर्वात प्रमुख अडथळा ठरू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांना दिसत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. अर्जुन व बाकिचे पांडव-कौरवांची गोष्ट सर्वांना ठाउक आहेच !

एकदा का आपण ही गोष्ट कटाक्षाने टाळायचॅ ठरवले की मात्र आपल्याला डोळ्यांनी दिसणारे निरनिराळे आकार रंग रंगसंगती इत्यादिची मोहिनी पडेल. व आपण मुक्त पणे चित्रकलेच्या प्रांगणात विहार करायला लागु --मनाचा अडथळा पार केलेला असू. आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न झालेल्या असतील.

आणि मग.. मनातील कोपर्‍यात चुकत माकत राहीलेल्या गोष्टीची जळमटे नाहीशी होतील.

" हे कसे करायचे माहीत नाही ? "

" हे कसे काढायचे हेच मला माहीत नाही ? "

"मला नेहमी असे वाटत असते पण ... "

" मला तर साधी सरळ रेघ ही काढता येत नाही ! "

" मी कोठून सुरुवात करूं ?"

" माझ्या मनात सगळा गोंधळ माजला आहे ! " वगैरे वगैरे...

आता तुम्ही ह्या सर्व गोष्टींना तिलांजली दिलेली असेल.

म्हणजे तुम्ही आत्ता मुक्तपणे चित्रे काढायला तय्यार झालेला असाल !!

( समाप्त)