Tuesday, August 30, 2011

चित्रकार श्री. रामचंद्र खरटमल ह्यांचे व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक

संस्कार भारतीच्या पुणे - पर्वती भागा मार्फत चित्रकार श्री. रामचंद्र खरटमल ह्यांचे व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक नुकतेच २७ ऑगस्ट २०११ ह्या दिवशी सकाळी १० ते १२ ह्या वेळेत संपन्न झाले. ह्या प्रात्यक्षिका साठी , "राजू फुलकर्स फिल्म इन्स्टीट्युट " च्या श्री  राजू फुलकर ह्यांनी त्यांच्या स्टुडीयोची सिंहगड रोड वरील जागा उपलब्ध करून दिली, एव्हढेच नाही तर सदरहू जागेचा असा होणारा उपयोग त्यांना आवडला असून ही जागा नियमीत वापरायला त्यांनी आवर्जून परवानगी दिली आहे. त्या नुसार या पुढे विठ्ठल वाडी येथे होणारा स्केचिंगचा वर्ग आता नित्य नेमाने ह्या जागेत दर शनिवारी सकाळी १० ते १२ ह्या वेळेत होणार आहे, तेव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य उपस्थितीत रहावे असे पर्वती भागा मार्फत कळविले आहे.

ठरल्या प्रमाणे  व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक सकाळी ठीक १० ला सुरू झाले
इथून पुढे काही फोटो व आठ क्लीप्स दिलेल्या आहेत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

ह्या पुढील चार क्लीप्स हे तर संपूर्ण कार्यक्रमाचे सार असून  चित्रकार श्री. रामचंद्र खरटमल ह्यांचेशी झालेल्या चर्चे मधून त्यांनी  स्केचिंगचे मर्मच उलगडून दाखविले आहे.
 १)

२)

३)

४)


त्यानंतर श्रीयुत खरटमलाचा श्रीयुत राजू फुलकरांच्या हस्ते  पुष्पगुच्छ व श्रीफल देऊन सन्मान केला


तर श्रीयुत राजू फुलकरांना श्री मानकर ह्यांनी  पुष्पगुच्छ देऊन आदर व्यक्त केला गेला.


श्रीयुत  राजू फुलकर हे स्वत: जे जे चे पास्ट स्टुडंट , एक उत्तम आर्टीस्ट गेली कित्येक वर्षे फिल्म जगताशी संबधीत व आता ही फिल्म अ‍ॅकेडमी ही उत्तम चालवतात, त्यांनी ही आपले विचार मांडले.अश्या पध्दतीने एक अतिशय उत्तम व कायम स्मरणात राहील असा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम संपन्न झाला.

शब्दांकन, स्थिर व चलत छायाचित्रण : सुरेश पेठे