Sunday, April 4, 2010

आजचा रविवार ( ४ एप्रील २०१०)आज आम्ही संस्कार भारतीचे संभाजी विभागाचे सभासद फर्ग्युसन महाविद्यालयात निसर्ग चित्रणाला गेलॊ होतो.ह्या महाविद्यालयाला खूप मोठा इतिहास आहे. खूप जुन्या जुन्या इमारती आहेत, तसेच ह्याला निसर्गाचे चांगलेच वरदान आहे व ते अजून टिकवून ठेवलेले आहे हे आपले महत्‌भाग्य आहे.

मी एक कोपरा शोधला जेथे भरपूर सावली होती. विशेष म्हणजे आज महाविद्यालयातील गर्दी तुरळक्च होती, अर्थात त्याने आम्हाला फारसा फरक पडत नाही. हा मुख्य इमारतीच्या दाव्या बाजूचा कोपरा होता.

मी एक पेन्सिलीने रेखाचित्र काढले ज्यात मुख्यत्वे करून उजेड व अंधाराचे वर्गीकरण दाखवायचा प्रयत्न केला आहे.
.


.


नंतर लगेचच हे चित्र रंगवायला घेतले. वरच्या चित्रात पेन्सिलिने दाखवलेले चित्रातील भाग रंगात दाखवले आहेत.
.
. आता खाली देत असलेले छायाचित्र त्या भागाचे आहे. अर्थातच ते नंतर व संदर्भा साठी घेतलेले आहे.