Wednesday, January 20, 2010

स्केचिंग आणि लॅंडस्केपिंग...१६_१७ जानेवारी

शनिवारी स्केचिंग ला पोचलो खरा पण खूप उशीरा पोचलो त्यामुळे नेहेमी इतकी काही झाली नाहित काढून. पण आजच्या स्केचिंग मधे एक वैशिष्ठ्य होते. शाळेतील दोन मुले स्केचिंग ला मॉडेल म्हणून तयार तर झाली पण मी आधी तू मग असे सुरू झाले त्यांचे तेव्हा दोघांनाही एकदम बसविले. आत्ता पर्यंत एकेकाचे काढीत असू !


मग आधी एकाचे स्केच कच्चे काढले व अंदाज घेत दुसऱ्याचे काढू लागलॊ! शेवटी दोघांमुळे बनलेला असा एकूण एक विषय आहे असे समजले की मग एकमेकां मधील संबंध लक्षात यायला लागतेव चित्र पूर्ण करता येते.

हे दुसरे चित्र एका रेलून बसलेल्या माणसाचे आहे. बसण्याची ढब  नेहेमी पेक्षा खूपच वेगळी आहे. हे चित्र काढताना त्या व्यक्तीच्या एकूण हावभावी कडे लक्ष जास्त ठवले होते, चेहऱ्यातील साधर्म्य जरा दुर्लक्षीत केले.रविवार, हा फारच धांदलीचा होता. सकाळी जमेल तसे काव्यांजलीचा कार्यक्रम सारस बागेत तर दुपारी पु.ल.देशपांडे उद्यानात होणारा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह-मेळावा त्याचा तर मी आयोजक होतॊ!!  म्हणून मी आज लॅंडस्केपिंगल सारस बागेत जाण्याचा निर्णय घेतला.


खालील दोन्ही चित्रे सारसबागेतील जलरंगात काढ्लेली आहेत.


Sunday, January 10, 2010

माझे पहिले स्केच

होय गेले कित्येक दिवस हा ब्लॉग बंद होता. अनेकांनी त्याबाबत विचारणा पण केली. गेल्या ऑगस्ट मध्ये पुनरागमन करण्याचे ठरवून तशी पोस्ट पब्लिश केलीही , पण कारण काहीही असो हा ब्लॉग पुन्हा चालू करायचे राहून गेले.. गेल्या वर्षात मी माझ्या ऑर्कुट वरील अल्बम मध्ये रिज एक नविन चित्र टाकण्याचा संकल्प ठरवला व नुकताच पूर्ण हि केला . व हा ब्लॉग चालू न करण्याला निमित्त मिळाले. आता चालू वर्षी  हा ब्लॉग आजपासूनच मी हा ब्लॉग पुन्हा चालू करीत आहे.

ह्या आधीच्या पोस्ट मधून स्केचिंग वर बरीच चर्चा केली आहे , आज मी माझे पहिलेच पेन्सिल  स्केच  टाकून सुरुवात करीत आहे.

 आम्ही पुण्याचे  संस्कार भारतीचे सभासद दर शनिवारी खास स्केचिंग साठी जमतो तर रविवारी एखाद्या स्पॉट वर जाऊन  तिथे निसर्ग चित्रे काढण्यात रमतो . कधी कधी रविवारी एखादे रंगीत स्केच पण काढून होते. तेव्हा साधारण पणे दर  सोमवार पर्यंत माझे एक तरी स्केच घेऊन इथे यायचेच असे ठरवले आहे.

 आज मी माझ्या एक स्नेहींना प्रथमच वर्गावर घेऊन गेलो.होतो. त्यांनाहि  हा अनुभव नवा होता. त्यांचे मी काढलेले पोर्ट्रेट--पेन्सिल स्केच खाली  देत आहे.