Wednesday, October 22, 2008

स्केचिंगची तयारी (३)

स्केचिंगची तयारी (३)

स्केचिंग बहुतांशी जलद करावे. जलद स्केचिंग हे काही संपूर्ण चित्र असत नाही. काही रेषा जीवनाचा आशय व्यक्त करीत असतात तर काही रेषा मनातील तरंग ... तरल भाव कागदावर उतरवित असतात. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या,

आपले डोळे पहाण्याचे काम करीत असतात.

आपले मन ते सर्व मनःपटलावर चित्र रेखाटीत असतात

तर ...... आपले हात, बिच्चारे मनाच्या हुकुमांचीतामिली करतात.

तेव्हा आपल्या मनाची धरसोड वॄत्ती हीच आपल्या स्केचिंग ला अडथळा करू शकतात. पुढील काही तत्त्वे उराशी बाळगलीत तर तुम्हीही उत्तम व जलद स्केचिंग कराल अशी माझी श्रध्दा आहे.

प्रत्येक वेळी स्केच काढतांना त्या वस्तू - गोष्टी कडे डोळस पणे पहा व त्याचे मनाने मनःपटलावर स्केच करीत रहाण्याचा छंद जोपासा. त्यासाठी कागद वा पेन्सीलची ही गरज नाही ! एकीकडे स्केव्हिंग चा सराव चालू असला कीच हे तुम्हाला जमेल. स्केचिंगसाठी एखादी वस्तू निरखणे म्हणजे त्याचा आकार , अवकाश, त्यातील ठळक वैशिष्टे , ह्याचा तुलनात्मक अभ्यास तुमचे मन मनातल्यामनात आपोआप करू लागेल आणि तेव्हाच तुमचे डोळेही स्केचिंगसाठी ( डोळसपणाने) उघडलेले असतील.

(क्रमशः)

2 comments:

Anonymous said...

नमस्कार,
रेखाटनांसंदर्भात हा ब्लॉग पाहून फार आनंद झाला. मीसुद्धा पेन्सिल स्केचिंग करते. आवड म्हणून. माझी काही स्केचेस या लिंकवर आहेत. http://mysketchingworld.blogspot.com/

मला माणसांचे केस रेखाटणे तसंच प्राण्यांचे मऊ केस, फ़र, पिसं वगैरे रेखाटणं कठीण वाटतं. त्यासंदर्भात मार्गदर्शन मिळू शकेल का? धन्यवाद. -वर्षा

सुरेश पेठे said...

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. सद्याचा टॉपीक संपल्यावर त्या संदर्भात लवकरच माझे विचार मांडेन.