Thursday, August 20, 2009

पुनरागमन !
हा ब्लॉग मी १३ ऑक्टॊबर २००८ ला सुरू केला, पण लगेचच १ जानेवारी २००९ पासून चालू वर्षी मी माझ्या ऑर्कूट प्रोफाईल च्या अल्बम मधे रोज एक चित्र देण्याचा संकल्प केला व तो व्रत म्हणून आजपावेतो पाळीत आलो व उर्वरीत काळात ही तो ठरल्या प्रमाणे पूर्ण करीनच अशी खात्री आहे.

माझ्या काही सुहृदांनी आपुलकीच्या भावनेतून हा बंद.पडलेला ब्लॉग पुन्हा नव्या जोमाने सुरू करावा अशी गळ घातल्याने मला दुसरा पर्याय ठेवलेलाच नाही !!

म्हणून आजच्या शुभदिनी मी तो सुरू करीत आहे ... कारण आपणास आठवत असेल की हा ब्लॉग मी जिला, माझ्या सख्ख्या मैत्रीणीला अर्पण केला होता, तिला बरोब्बर एक वर्षा पूर्वी आजच्या दिवशी प्रत्यक्ष भेटलो होतो ! मग इतका चांगला मुहूर्त दुसरा कुठला असू शकेल ?