Sunday, July 25, 2010

आजचे निसर्ग-चित्रण व व्यक्तीचित्र

आज रविवार लॅंडस्केपिंग ला जाण्याचा वार. खरे तर आज डेक्कन कॉलेजला जायचे होते पण एक तर ते खूप लांब आहे तसेच गेले तीन चार दिवस सतत पाउस येतोय त्यामुळे अंगात आळस मुरलाय, तेव्हा जवळच गोखले इन्स्टीट्युट जायचे ठरले. तरीहि पावसात बाहेर पडायचा कंटाळाच आला होता.... म्हणजे स्कुटर काढा, रेनकोट म्हणजे खोगीर अंगावर चढवा... वगैरे.

काल एक नवीन वृध्दत्वाकडे झुकलेले गृहस्थ आमच्या शनिवारच्या वर्गा्ला जॉईन झालेत, मी त्यांना फोन करीत आज येणार आहेत काय विचारले तर ते निघत होते व तेच म्हणाले की त्यांना मला पिक अप करू दे का ? त्यांना दिसली नसली तरी मी माझी मान जोरात हलवली व लगेच तयार होत वाटेत पोहोचलो!

तसे आम्ही आज फार जण नव्हतोच ६-७ च होतो त्यात हे व अजून एक नूरभाई अगदिच नवीन होते. मग पहिली काही मिनीटे त्या दोघांना प्राथमिक माहीती व स्केचिंगच्या महत्वाच्या बाबी सांगत त्यांना थोडे अवगत केले व मी माझ्या कामाकडे वळलो. एक स्पॉट निवडून स्केचिंग सुरू केले व रंगवायला लागणार तेव्हढ्यात दोघे माझ्याजवळ येऊन मी काढलेल्या स्केचिंगवर व थोड्या वेळा पुर्वी सांगीतलेले मुद्दे ह्यावर चर्चा झाली व त्या दोघांनी आता मी कसे रंगवतो हे पहाण्यासाठी तेथेच ठाण मांडले. हळू हळू एकीकडे गप्पा चर्चा होत चित्र आकार घेऊ लागले. हेच ते चित्र !आज दुसरे आलेल्या नूरभाईंच्या व्यकिमत्वाने मला आकर्षित केले होते. खरं म्हणजे त्यांना लवकर माघारी वळून बाहेर गावी परतायचे होते पण थोडीशी रिक्वेस्ट केल्यावर ते तयार झाले. बरेच दिवसात जलरंगात व्यक्तिचित्र केलेले नव्ह्ते. थोडी धाकधूक होतीच. शिवाय पावसाळ्यात जलरंग लवकर वाळत नाही, थोड्याश्याही चुकीने चित्र बाद होऊ शकते तरीही हिय्या करीत सुरुवात करून पूर्णही केले.

7 comments:

मी अत्त्यानंद said...

मस्त!!!!

सुरेश पेठे said...

आपल्या अभिप्रायाने अत्त्यानंद, अत्त्यानंद झाला !

RUPESH PATIL said...

Hallo sir!
i like ur sketch work and painting work!such a impressive.
sir when u get time meet my blog and send me ur kind comments.

best regards!

Anonymous said...

काका,
मला चित्रकलेचे रसग्रहण विशेष करता येत नाही पण तुमची चित्रे खूपच आवडतात!
-निरंजन

Vinayak said...

Khup surekh sketches ahet sir!

Vinayak said...

Far chan sketches ahet Sir!

Prasanna said...

Kaka, sunder wyakti chitran apratim. khup divasani cchan watal tumachi chitra baghun.