Monday, February 22, 2010

व्यक्तीचित्रण

आज मी येथे पेन्सिलीने काढलेल्या एका व्यक्ती चित्रणाचे चार भागात विवरण देण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्या पध्दतीने करीत असलेले विवरण आपणास किती आवडले ? तसेच त्यात आपणास काही त्रुटी आढळली आहे का? आपणास काही शंका असेल तर त्या इथे विचारल्या जाणे अपेक्षित आहे, म्हणजे त्यावर अधिक चर्चा करता येईल.



१) इथे फक्त चेहऱ्याच्या बाह्य आकारा कडे लक्ष दिले असून, ते कागदावर रेखाटताना चेहेऱ्या वरील महत्वाच्या अवयवां ची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे.







२) पुढल्या भागात चेहऱ्यावर पडलेल्या उजेडा मुळे तयार झाल्रेले फिकट व गडद छटांचे भाग ओळखून हळू हळू त्याची विभागणी करीत ते कागदावर उमटविण्याचा येथे प्रयत्न केला आहे.



३) ह्या तिसऱ्या भागात बहुतांश भाग पूर्ण करीत आणलेला आहे, मात्र एक डोळा लहानल्या सारखा वाटतोय.



4)४) ह्या चवथ्या भागात तो भाग खोड रबराचे साह्याने हळूवार हाताने दुरूस्त केला आहे, खरे तर मूळ रेखाटनातच हे काम व्हायला गवे होते. बाकीच्या भागाच्या छटा जुळवून चित्र पूर्ण केले आहे.





वरील चित्र एका फोटोवरून काढलेले असले तरी समोर एखाद्या व्यक्तीला बसवून  देखिल ह्याच पध्दतीने चित्र काढता येईल


8 comments:

Anonymous said...

धन्यवाद. मी चित्रकलेत नापास झालेला विद्यार्थी. पण आता असे वाटते की मला ही जमेल. हुसेनला एकदा मी विचारले होते कि मला तुझ्या सारखी चित्रे काढता येतील का? त्याने प्रथम मला माझे नाव विचारले व नंतर म्हणाला "अरे प्रकाश, घे कागद आंणि पेन्सिल, काढ रेघोट्या. सराव करीत राहिलास तर एक दिवस तुझे ही नाव हुसेन सारखे चमकेल.
आणि मी देखील सराव सोडून दिला तर तुझ्या सारखीच चित्रें काढायला लागीन."

सुरेश पेठे said...

प्रकाशजी इथॆ कोणाला परीक्षा द्यायचीय ? हा सारा मामला/खेळ छाया - प्रकाशचाच तर असतो, तुम्ही प्रकाश आहतच तुम्हाला फक्त छायाच शोधायचीय !

आशिष देशपांडे said...

Kaka kharach sunder aahe post...Atishay chaan...Mala chitrkaletla 'अ' suddha yet nahi; pan chitrakaraana khup daad dyawishi vaatate..

Unknown said...

काका फारचं सुंदर......आता असे झालेय तुम्ही दो कराने देत आहात आमची झोळी पुरायला हवी!!!

Anonymous said...

नमस्कार काका,
अरे वा आपण तर स्केचिंक वर्ग सुरु केलात. फ़ार छान. व आपण काढलेलं चित्रही सुरेख जमल.

supriyauday said...

kaka khupach chan aale aahe maze sketch.
Uday aalyavar mhanunach tabadtob tumhala phone kela hota. Udayala , aaila khup awadale sketch.
Taichahi ratri phone aala hota, ishaan lagech olakhun mhanala hi tar mavashi aahe mhanun, lagech mala phone kela tyane.
Tai mhanate tyapramane kharach aamchi Zoli Purayala havi.
Asech aamchya sobat raha nehamai aani aata Kerala trip tharava aekada.

mau said...

sahiiiii.....apeatim kadhale aahe Kaka...faarach sundar...

भानस said...

पेठेकाका, हा प्रकाश-छायेचा खेळ फारच झकास. खूपच सुंदर.