Wednesday, January 20, 2010

स्केचिंग आणि लॅंडस्केपिंग...१६_१७ जानेवारी

शनिवारी स्केचिंग ला पोचलो खरा पण खूप उशीरा पोचलो त्यामुळे नेहेमी इतकी काही झाली नाहित काढून. पण आजच्या स्केचिंग मधे एक वैशिष्ठ्य होते. शाळेतील दोन मुले स्केचिंग ला मॉडेल म्हणून तयार तर झाली पण मी आधी तू मग असे सुरू झाले त्यांचे तेव्हा दोघांनाही एकदम बसविले. आत्ता पर्यंत एकेकाचे काढीत असू !


मग आधी एकाचे स्केच कच्चे काढले व अंदाज घेत दुसऱ्याचे काढू लागलॊ! शेवटी दोघांमुळे बनलेला असा एकूण एक विषय आहे असे समजले की मग एकमेकां मधील संबंध लक्षात यायला लागतेव चित्र पूर्ण करता येते.

हे दुसरे चित्र एका रेलून बसलेल्या माणसाचे आहे. बसण्याची ढब  नेहेमी पेक्षा खूपच वेगळी आहे. हे चित्र काढताना त्या व्यक्तीच्या एकूण हावभावी कडे लक्ष जास्त ठवले होते, चेहऱ्यातील साधर्म्य जरा दुर्लक्षीत केले.रविवार, हा फारच धांदलीचा होता. सकाळी जमेल तसे काव्यांजलीचा कार्यक्रम सारस बागेत तर दुपारी पु.ल.देशपांडे उद्यानात होणारा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह-मेळावा त्याचा तर मी आयोजक होतॊ!!  म्हणून मी आज लॅंडस्केपिंगल सारस बागेत जाण्याचा निर्णय घेतला.


खालील दोन्ही चित्रे सारसबागेतील जलरंगात काढ्लेली आहेत.


2 comments:

हेरंब said...

काका, अप्रतिम स्केचेस. त्या रेलून बसलेल्या मुलाचं स्केच तर जाम आवडलं

Ajay Patil said...

छान, आत्ता नियमित पणे तुमची स्केचेस पहायला मीळतील, मागच्या रविवारी पूण्यात होतो, तुम्हाला स्क्र्याप टाकला होता पण बहुदा तुम्ही नाशकात होता.