Tuesday, March 30, 2010

चित्र असेही बनते !

परवां रविवार दिनांक २८ मार्च ला आम्ही निसर्ग चित्रणा साठी फर्ग्युसन महाविद्यालयात जमलो होतो, पण का कोण जाणे कुठलेच दृश्य मनाची पकड घेत नव्हते. आज कसलीशी परिक्षा असावी त्यामुळे इतस्तत:मुले व मुली हिंडत,  वाट पहात जमेल तसा अभ्यास करीत बसलेल्या होत्या. मी मनात शेवटी असा विचार केला की अश्या पध्दतीने समुदाया चे रेखन कधी करायला मिळणार? मी भराभर त्यांची रेखाचित्रे काढू लागलो. ही त्यातलीच  काही रेखा चित्रे  खाली दिली आहेत.


त्या नंतर मुख्य ऍम्फि थिएटर च्या बाजूच्या व्हरांडाचे खांब व कमानी कडे लक्ष गेले व हा विषय मनाला भावला तसेच त्यात आता जिवंत पणा यावा ह्या हेतूने आधीच्या रेखाचित्रांतील काहींना ह्या चित्रात सामावून घेत आजचे चित्र पूर्ण केले.मी नेहमीच प्रत्यक्ष जागेवर जाऊन निसर्ग चित्रण करीत असतो. मी स्वत: कधीच छायाचित्रांचा उपयोग करीत नाही, मात्र मधे आधे कीवा शेवटी केव्हातरी त्या दृश्याचे छाया- चित्रण करून ठेवतॊ संदर्भा साठी.आता आपण सांगायचे आहे की आपणास हे चित्र कसे वाटले ते ?

16 comments:

canvas said...

काका, तुमच्या कल्पना शक्तीला सलाम.
मस्त एकमद आवडल आपल्याला.

www.ankushkharche.blogspot.com said...

सर मला आपले रेखाकन खूप आवडले मलाही चित्राची (रेखाकानाची ) आवड आहे पण मी इतके सुंदर रेखाकन करू सकट नाही मला आपला ब्लॉग नेहमी वाचायला आवडेल ........

www.ankushkharche.blogspot.com said...
This comment has been removed by a blog administrator.
Vivek said...

खूपच सुरेख! पोर्चच्या आतल्या भागातल्या अंधारामुळे त्रिमितीय आभास एकदम मस्त आलाय. फोटोपेक्षाही चित्र अधिक सजीव वाटतंय.

canvas said...

काका, मी आपल्या ब्लाग चा नियमित वाचक आहे.
माझ्या पण चित्रकले मध्ये खंड पडला होता. पण आपला हा ब्लाग आणि आपल्या स्केचने मला पुन्हा चित्रकले कडे ओढल आहे.

धन्यवाद आम्हाला चित्रकले साठी प्रेरणा दिल्याबद्दल.

सागर said...

काका
नका आवडले ..सुंदर काढले आहेत...

माऊ said...

कमाल झाली काका तुमची..खरच ग्रेट अहात तुम्ही...

tanvi said...

काका मस्त झालेय चित्र..... किती सोपे करुन सांगितलेय तुम्ही.... ग्रेट...

शांतीसुधा said...

खूपच छान चित्रं आहे. मिलींद मुळीक यांच्या चित्रांची आठवण झाली.

Prasanna said...

Kaka mast aalay chitra ekdam sahi

sureshpethe said...

@ शांतीसुधा,
अभिप्रायाबद्दल आभार ! आपण फारच मोठ्या चित्रकारांचे नाव घेतलेत, मी त्यांना गुरूसमान मानतो.

sureshpethe said...

@ कॅन्व्हास
@ अंकुश खर्चे
@ विवेक
@ सागर

अभिप्रायाबद्दल आभार

sureshpethe said...

@ माऊ,
अभिप्रायाबद्दल आभार, काय जोरात प्रॅक्टीस सुरू केलीस की नाही ?

sureshpethe said...

@ तन्वी,

खरंच आहे मनात आणलेत तर सोपे वाटु लागते !

DPS Bose said...

Your Fist sketch is good

Vilas Patki said...

Suresh Pethe Sir,

You are very creative and make others to be creative!!The idea of getting a snap of the location where the art-form takes birth is just innovative!! The art-form is very beautiful! I remember very famous line from Geetramayan..."prtyakshahun pratima sundar!!"