सध्या मी गेले काही दिवस माझ्या मुलीकडे दत्तवाडी येथे रहायला गेलेलो आहे. त्यामुळे माझ्या सकाळच्या हिंडण्याच्या मार्गातही बदल झाला. सिंहगड रोड वरील पु.ल.देशपांडे उद्यान हे माझे ह्या रोड वरील आवडते ठीकाण. अर्थात माझ्या स्केचबुक लाही पु.ल. ची सहल करावी लागलीच !
१) हे उद्यान मुख्यत्वे चालण्यासाठी आहे. हिरवळ फक्त पहायची ! चालायचे मात्र कॉंक्रीट च्या पायवाटे वरूनच ! अश्याच एका वळणावरील हे रेखांकन .
२) हे ही अश्याच एका वळणावरील रेखांकन ! खालून मंजूळ आवाजात पाणी पडू का नकॊ अश्या थाटात , तर वर लाकडाचा भास निर्माण होईल असा कॉंक्रीटचाच पुल वरून ’खळखळ’ पहाण्य़ासाठी केलेला.
३) हा एक मानव निर्मित छोटासा धबधबा ! मला रेखांकनाला विषय तर मिळाला. एकूण हे पूर्ण उद्यान जपानी पध्दतीने केलेले आहे. विस्तृत भाग व हिरवळी मुळे मन मात्र प्रसन्न होते.
४) हे मात्र मी जलरंगात केलेले चित्र आहे. थोडासा रंगांचा शिडकावा कसा आहे ह्याची कल्पना यावी हा उद्देश. त्या साठी काढलेले एका कृत्रिम पुलाचे चित्र ! for a change.
कसे वाटले जरूर कळवा मात्र !
Wednesday, February 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
11 comments:
Sagli chitr khupach chhan aahet..
tumhala vyaktichitre kadhata yetat ka ho...
karan mala yet nahi pan shikayachi aahet
Tumachi rekhankane kharach khup chaan aahet kaka..Mala tari khup awadtaat...
chhaan
पेठेकाका, ही चारही चित्रे मस्तच जमलीत. कलर केलेल्या चित्रातील रंगाचा वापर मस्त. सकाळच्या पहिल्या काही प्रहरांमधली शांती-प्रसन्नता जाणवते.
@ राहूल,
नुकतीच एक पोस्ट व्यक्तीचित्रणावर टाकलेली आहे. मात्र इंजीनीयरींग इतके सोपे मात्र नाही !! तुझी शिकायची इच्छा बळकट असेल व मेहनत म्हणजे रोज सराव करणार असशील तर तुलाही यायला लागेल.
पुण्यात संस्कार भारतीचे दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळात नारायण पेठेतील रमण बाग शाळॆत वर्ग असतात तू जॉईन करू शकतॊस .
@ आशिष देशपांडे व @ अजय जी,
प्रतिक्रिये बद्दल आभार
@ भाग्यश्री,
प्रतिक्रियेबद्दल आभार ! खरे तर हे चित्र अर्धवट आहे ( काय करू बागेची वेळ अकरा पर्यंतच होती म्हणे ! ) म्हणून टाकणार नव्हतो.
kaka pencile skaches surekh purn barkavyanishi ahet...pan me rang wedi aslyane mala water colour painting jast bhawle...rangch nastil ayushya tar...?ani tumche brush che stroks itke najaktine marle ahet...ekdam sunder.
मराठी ब्लोगविश्वात तुमचा ब्लोग एकदमच वेगळा आहे. शब्दापेक्षा कुंचल्याचे सामर्थ्य मोठे!
मस्तच. खरच खुपच छान. शब्द नाहीत माझ्याकडे.
जिवानिका,
अभिप्राया बद्दल आभार
Post a Comment