संस्कार भारती, संभाजी विभाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने कोथरूड येथे वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे वर्ग शनिवार दिनांक २७ मार्च २०१० पासून प्रत्येक शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत बाल शिक्षण शाळेत सुरू करीत आहोत. ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त पूर्ण वर्षासाठी असणार आहेत ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारच्या निसर्गचित्र वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. ह्या वर्गाला अधून मधून मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गात १५ वर्षा वरील कोणाही स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चित लाभ करून घेता येईल. इच्छूकांनी श्री.सुरेश पेठे ह्यांचेशी
ईमेल sureshpethe@gmail.com
अथवा ९८५०४८८६४० ह्या क्रमांका वर संपर्क साधावा.
Friday, February 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment