होय गेले कित्येक दिवस हा ब्लॉग बंद होता. अनेकांनी त्याबाबत विचारणा पण केली. गेल्या ऑगस्ट मध्ये पुनरागमन करण्याचे ठरवून तशी पोस्ट पब्लिश केलीही , पण कारण काहीही असो हा ब्लॉग पुन्हा चालू करायचे राहून गेले.. गेल्या वर्षात मी माझ्या ऑर्कुट वरील अल्बम मध्ये रिज एक नविन चित्र टाकण्याचा संकल्प ठरवला व नुकताच पूर्ण हि केला . व हा ब्लॉग चालू न करण्याला निमित्त मिळाले. आता चालू वर्षी हा ब्लॉग आजपासूनच मी हा ब्लॉग पुन्हा चालू करीत आहे.
ह्या आधीच्या पोस्ट मधून स्केचिंग वर बरीच चर्चा केली आहे , आज मी माझे पहिलेच पेन्सिल स्केच टाकून सुरुवात करीत आहे.
आम्ही पुण्याचे संस्कार भारतीचे सभासद दर शनिवारी खास स्केचिंग साठी जमतो तर रविवारी एखाद्या स्पॉट वर जाऊन तिथे निसर्ग चित्रे काढण्यात रमतो . कधी कधी रविवारी एखादे रंगीत स्केच पण काढून होते. तेव्हा साधारण पणे दर सोमवार पर्यंत माझे एक तरी स्केच घेऊन इथे यायचेच असे ठरवले आहे.
आज मी माझ्या एक स्नेहींना प्रथमच वर्गावर घेऊन गेलो.होतो. त्यांनाहि हा अनुभव नवा होता. त्यांचे मी काढलेले पोर्ट्रेट--पेन्सिल स्केच खाली देत आहे.
Sunday, January 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
अप्रतिम..खुपच मस्त स्केच आहे हे पेठे काका
सुहास,
अभिप्रायाबद्दल आभार
सुरेश पेठे
मस्तच आहे स्केच काका...
एक सुचना करू का...ज्या व्यक्तीचे स्केच आहे तिचा फोटोही त्यांच्या अनुमतीने टाकू शकलात तर आम्हाला सगळे बारकावे कसे रेखाटले आहेत ते आणिक व्यवस्थित समजतील आणि पुढच्या स्केचिंग्सला मदत होइल.....
तन्वी हे नेहमीच शक्य नाही. माझ्या अल्बम मध्ये असे फोटो व मी काढलेली स्केचेस दिलेली आहेत ती पहिलीत का?
खरे तर त्यासाठी मी एक ब्लॉग सुरु केला होता त्यात विशेषत: मी काढलेले निसर्गाचे चित्र व त्याच भागाचा फोटो. पण ते चित्र मी फोटोवरुन काढलेय की काय असा संभ्रम पाहणाऱ्याला पडेल असे वाटून मी तो बंदच ठेवला.
अश्या तऱ्हेची एक पोस्ट मी लवकरच टाकीन , बघुया त्यावर काय प्रतिसाद मिळतोय ते.
हरेकृष्ण,
अत्यंत आभारी आहे. १७ ला पुण्यात भेटत आहात ना?
Post a Comment