१) इथे फक्त चेहऱ्याच्या बाह्य आकारा कडे लक्ष दिले असून, ते कागदावर रेखाटताना चेहेऱ्या वरील महत्वाच्या अवयवां ची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे.
२) पुढल्या भागात चेहऱ्यावर पडलेल्या उजेडा मुळे तयार झाल्रेले फिकट व गडद छटांचे भाग ओळखून हळू हळू त्याची विभागणी करीत ते कागदावर उमटविण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
३) ह्या तिसऱ्या भागात बहुतांश भाग पूर्ण करीत आणलेला आहे, मात्र एक डोळा लहानल्या सारखा वाटतोय.
4)४) ह्या चवथ्या भागात तो भाग खोड रबराचे साह्याने हळूवार हाताने दुरूस्त केला आहे, खरे तर मूळ रेखाटनातच हे काम व्हायला गवे होते. बाकीच्या भागाच्या छटा जुळवून चित्र पूर्ण केले आहे.
वरील चित्र एका फोटोवरून काढलेले असले तरी समोर एखाद्या व्यक्तीला बसवून देखिल ह्याच पध्दतीने चित्र काढता येईल



